Home मराठी चाचणी iPhone 10 पूर्ण चाचणी

iPhone 10 पूर्ण चाचणी

0
iPhone 10 पूर्ण चाचणी

2019 लवकरच येत आहे आणि आपण अद्याप नवीन वर्षातील नवीन iPhone XS, iPhone XS Max किंवा iPhone 10 या तीन मोबाईल्स दरम्यान तुम्ही नक्कीच गोंधळलेला आहात. तर आता आपण हा महाग फोन विकत घ्यावा का हा प्रश्न आपली समोर येतो? जेव्हा iPhone 10 लॉन्च करण्यात आला तेव्हा ग्लास बॅकसह नवीन आयफोनची डिझाइन खूपच सुंदर होती आणि आता तर बहुतेक फोन ग्लास डिझाइनसह येत आहेत. OnePlus 6, HTC U 12+, Huawei P 20 आणि अजून बरेच मिड-रेंज फोन ग्लास डिझाइन मध्ये उपलब्ध आहेत . तर या फोनबद्दल अश्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला भविष्यात खर्च करण्यास प्रोत्साहित करु शकतील? तर iPhone X चे आपण निरीक्षण करूया.

मी दरवर्षी हे ऐकतो की “मी नवीन आयफोन विकत घेऊ का?” पण यावर्षी हा प्रश्न आणखी कठीण दिसून येतो आहे कारण या वर्षी iPhone 8 आणि iPhone 8 Plus नव्हे तर iPhone 10 देखील आपल्या साठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नेहमीप्रमाणे साधे उत्तर हे आहे कि ते अवलंबून आहे कि आपला आत्ताचा iPhone किती जुना आहे, आणी नवीन iPhone किती आणि कोणते नवीन वैशिष्ट्ये धारण करतो यावर अवलंबून आहे असा निष्कर्ष या उत्तरातून निर्माण होतो.

माझ्या मते लोक खरोखर विचारत आहेत ते iPhone 10 खरेदी करायचा कि नाही हा विचार नाही, तर “iPhone 10 खरोखरच एक आधुनिक आणि किमतीला साजेल असा फोने आहे का?”

माझे उत्तर दुर्दैवाने आपल्याला स्पष्टीकरण देऊ शकणार नाही परंतु आपण हा फोने घ्यावा की नाही याची कल्पना तुम्हाला निश्चितपणे देईल. आपल्याला सध्या iPhone 10 ची अजिबात आवश्यकता नाही. iPhone 8 किंवा iPhone 8 Plus खरेदी केल्यास आपल्याला MeMoji हा एक फीचर सोडला तर A11 Bionic Processor आणि सुधारणा केलेला कॅमेरा त्यात आपल्याला मिळतात जे iPhone 10 मध्ये आहेत. हे सगळं ऐकून आपल्याला iPhone 10 हवाहवासा वाटू लागतो.

iPhone मध्ये मला नेहमी आकर्षित करणाऱ्या गोष्टींपैकी एक म्हणजे टेकनॉलॉगी आणि भविष्याशी त्याचे कनेक्शन. आम्ही दरवर्षी नवीन iPhone पाहतो, परंतु iPhone 10 मधील FaceID सुरक्षा, उच्च-गुणवत्तेची OLED स्क्रीन आणि प्रोसेसर डिझाइनमध्ये प्रगती यासारख्या तंत्रज्ञानाचे संशोधन करण्यात अनेक वर्ष निघून जातात यात काही नवल नाही.

iPhone 10 FaceID किती सुरक्षित आहे?

चेहरा ओळखणे ही एक अशी गोष्ट आहे ज्यावर Apple कमीतकमी तीन ते पाच वर्षांपासून कार्यरत आहे. लहान, शक्तिशाली आणि कार्यक्षम प्रोसेसरच्या डिझाइनिंगसाठी बर्याच वर्षांची आवश्यकता असते आणि आता Apple ने हे जगाला करून दाखवले आहे आणी नवीन iPhone मध्ये ही नवीन वैशिष्ट्ये सादर केली आहेत.

एक खबर ही आहे की 5 वर्ष जुना असलेला iPhone 5S ला आधिकारिकपणे आयओएस 12 अपडेट प्राप्त होईल. तर आपण 5 वर्षांपूर्वी आलेला फोने घ्याल किव्हा 6 महिन्यांपूर्वी आलेला फोन खरेदी कराल तर काळजी करण्याची आवश्यकता नाही कारण जुने फोन देखील नवीन iOS १२ वर चालू शकतात.

FaceID पूर्ण अंधारात काम करतो का? किंवा iPhone 10 मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आहे का?

iPhone 10 मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर उपलब्ध नाही आहे. आपण अर्ध्या झोपेत असाल आणि आपल्याला SMS तपासण्याची आवश्यकता असेल, आपल्याला आपला पासकोड इनपुट करणे आवश्यक नाही. बर्याचदा मी फक्त फोन उघडण्यासाठी स्वाइप करतो आणि अनलॉकिंग इतके वेगवान होते की मला लॉक आहे किंवा नाही असे आश्चर्य वाटते.

iPhone 10 गुळगुळीत आहे का किंवा मला केस वापरण्याची आवश्यकता आहे का?

इतर फोनच्या विपरीत, iPhone 10 हाताळायला सोप्पा आहे आणि तो जास्त घसरत नाही. त्याचे कोपरे हातात व्यवस्थित बसतात आणि आपण फोनवर खेळू इच्छित असणाऱ्या लोकांना हि गोष्टं खूप साहाय्य करते.

आयफोन 10 ची कॅमेरा चाचणी.

मला ड्युअल कॅमेरा सिस्टीम फोनमध्ये असणे आवडते आणि फोटो विलक्षणपणे येतात, विशेषतः पोर्ट्रेट मोड मधील फोटो. iPhone 10 ची स्क्रीन प्रत्यक्षात iPhone 8 Plus च्या स्क्रीनपेक्षा किंचित उंच आहे, त्यामुळे जरी iPhone 10 शारीरिकदृष्ट्या लहान असेल तरीही आपल्याला यावर जेमतेम iPhone ८ Plus
एवढी स्क्रीन मिळत आहे.

iPhone 10 ची बॅटरी लाइफ.

मी हे देखील लक्षात घेतले आहे की iPhone 10 च्या बॅटरीचे आयुष्य इतर आयफोनवर जास्त सुधारले आहे. मी सकाळच्या एका फुल चार्जवर संपूर्ण दिवसाचे बॅटरी आयुष्य मिळवतो.

तुम्ही 2018 मध्ये भारतात iPhone 10 विकत घ्यायला पाहीजे का?

जर आपल्याला एक संपूर्ण फोन आणि iPhone 8 Plus सारखा शक्तिशाली फोन हवा असेल आणी ज्याचा कॉम्पॅक्ट फॉर्म असेल, तर आपल्याला iPhone 10 आवडेल.

iPhone 10 वर जेस्चर्स खूपच जलद आहेत. फोन अनलॉक करण्यासाठी फक्त फोन उचलून चेहऱ्या समोर आणताच काही क्षणात फोन अनलॉक होतो. कोणताही गोंधळ नाही आणि या FaceID चा वापर सर्वात सुरक्षित आहे.

मला ठामपणे असं वाटत की iPhone 10 शी तुलना करता यावी असा इतर कोणतीही फोन नाही आहे. मी गेल्या 8 महिन्यांपासून iPhone 10 वापरत आहे आणि माझा अनुभव खूपच चांगला आहे. या फोनची किंमत तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही हा फोन जरूर घ्यावा असा उपदेश मी तुम्हाला जाहीरपणे देऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here